शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

गांधी विचाराने काम करणारी माणसं मरत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:04 IST

गडहिंग्लज : गांधीजींच्या विचाराने काम करणारी माणसं मरत नाहीत. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश अशी माणसं मरत नसतात. त्यांनी गांधीजींचा विचार मोठा केला, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले.येथील लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या सांगता सोहळ्यात पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

गडहिंग्लज : गांधीजींच्या विचाराने काम करणारी माणसं मरत नाहीत. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश अशी माणसं मरत नसतात. त्यांनी गांधीजींचा विचार मोठा केला, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले.येथील लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या सांगता सोहळ्यात पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे होते. उपनगराध्यक्ष नितीन देसाई, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. लहान माणसं विस्मरणात जातात. मोठ्या माणसाची आठवण जगभर राहते. त्यामुळेच सत्याग्रही गांधीजी मारले जाऊनही त्यांची आठवण जगभर आजही कायम आहे, असेही द्वादशीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.साने गुरुजी वाचनालयातर्फे श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते कॉ. संपत देसाई यांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने, तर नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कवी दिनकर मनवर यांचा साने गुरुजी साहित्य पुरस्काराने गौरव झाला. प्रत्येकी २५ हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. भगवंता लहू कांबळे यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, तर अशोक पट्टणशेट्टी व अंजली सावंत यांना भिकाजीराव मोहिते आदर्श वाचक पुरस्कार देण्यात आला. द्वादशीवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले.अ‍ॅड. शिंदे म्हणाले, माणसं मारून विचार संपत नाही, हे त्यांना कधीतरी एक दिवस समजेल.कॉ. देसाई म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जाणाºया काळात मिळालेल्या दाभोलकर पुरस्काराने सामान्य जनतेच्या लढाईला बळ मिळाले आहे. कवी मनवर यांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी राजन गवस, बाळासाहेब मोरे, आप्पा डिंगणकर, अरुण नाईक, नितीन पाटील, आदी उपस्थित होते. वाचनालय व शिक्षण समिती सभापती नरेंद्र भद्रापूर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब मुल्ला यांनी अतिथी परिचय करून दिला. गणपतराव पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी आभार मानले.गडहिंग्लज पालिका ‘गुणग्राहक’ !राजकारणी माणसांना चांगल्या माणसाचं कौतुक करण्याची बुद्धी होत नाही, परंतु आदर्श वाचक, आदर्श शिक्षक, आदर्श कार्यकर्ता आणि साहित्यिकांचा गौरव करणारी गडहिंग्लज पालिका गुणग्राहक आहे, या शब्दांत संपादक द्वादशीवार यांनी गडहिंग्लज नगरपालिकेचे कौतुक केले.